माळेगाव कारखाना निवडणूक: अजित पवारांचा दणदणीत विजय, शरद पवारांच्या पराभवाने हादरा?

Spread the love

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक भले चौरंगी वाटत असती तरी ती होती तावरे विरुद्ध दादा 33 वर्ष जुना संघर्ष माळेगावच्या यंदाच्या इलेक्शन मुळे पुन्हा एकदा फॉर्मात आला होता पण या संघर्षाला एक तिसरी बाजू सुद्धा होती शरद पवारांची सुरुवातीला शरद पवार गट या निवडणुकीत उतरणार नाही अशी चर्चा झाली पण ही चर्चा मागे पडून शरद पवार गटान आपलं पॅनल उतरवलं योगेंद्र पवारांनी प्रचाराची धुरा सांभाळली सुप्रिया सोय सुद्धा प्रचारात होत्या.

पण प्रत्यक्षात शरद पवार गट प्रचाराच्या पलीकडे निवडणुकीच्या रिगिणा दिसलाच नाही. 21 जागांच्या निकालात अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलन 20 एकन न बाजी मारली. चंद्रराव तावेंच्या पॅनलचा पराभव झाला. दादा तावरे संघर्षात दादांच्या विजयाची चर्चा होत असली, तरी पराभव फक्त तावेंचा झाला नाही. तर तो शरद पवारांचाही झालाय. शरद पवारांचा गट या निवडणुकीत एकही जागा न जिंकता तिसऱ्या नंबरला फेकला गेला आणि दादा तावरे यांच्या राड्यात चर्चा सुरू झाली शरद पवारांच्या हातून मैदान गेल्याची कारखान्याच्या इलेक्शन मधल्या पराभवानंतर ही चर्चा का सुरू झाली पवारांच्या हातून पूर्ण मैदान खरच गेलय का त्याची स्टोरी

आजपर्यंतच्या आपल्या कार्यकीर्दीत शरद पवारांनी सहकार आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारण केल्याच बघायला मिळतं राजकारणात महत्त्वाच्या पदावर असतानाही शरद पवारांनी सहकारी संस्थांवरची त्यांची पकड सैल होऊन दिली नव्हती वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट विद्या प्रतिष्ठान रयत शिक्षण संस्था ग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांसारख्या अनेक संस्थांचे जाळ शरद पवारांनी विणलं या सगळ्या संस्था शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जातात.

रयत शिक्षण संस्थेत चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात महाराष्ट्रभर रयत शिक्षण संस्थेच्या शाळा शाळा कॉलेजेस आहेत रयत राज्यातलीच नाही तर आशिया खंडातली सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते फक्त साखर कारखान्याच्या संदर्भात रिसर्च करणारी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ही एकमेव संस्था आहे बारामतीत विद्या प्रतिष्ठानच मोठं महत्त्व आहे कारण विद्या प्रतिष्ठानमध्येही जवळपास 30 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात 2000 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षके इतर कर्मचारी विद्या प्रतिष्ठानमध्ये थोडक्यात या संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माणसं जोडली जातात.

लाभार्थ्यांच समीकरण तयार होतं या संस्थांवर पकड असणं राजकारणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाच ठरतं या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांप्रमाणेच बारामती मधला माळेगाव सहकारी कारखाना सुद्धा पवारांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जायचा मागच्या पाच वर्षात अजित पवार माळेगाव कारखान्याचे काम बघत होते पण असं असलं तरी माळेगाव कारखान्याची ओळख शरद पवारांचा कारखाना म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर माळेगाव कारखान्याची ही पहिलीच निवडणूक होती.

सुरुवातीला माळेगावच्या निवडणुकीसाठी अजित पवार आणि शरद पवार हातपिवणी करतील अशा बातम्या आल्या होत्या पण दोन्ही पवार निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरले. शरद पवार गटाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवारांनी केलं. त्यांनी सभा घेतल्या दौरे केले. पण शरद पवार मात्र बैठकांच्या पलीकडे ऍक्टिव्ह नव्हते. मात्र माळेगावची निवडणूकच दादा विरुद्ध तावरे अशी रंगली.

शरद पवारांच्या गटाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्यांचे उमेदवार जिंकण्याच्या शर्यतीत तर आले नाहीतच पण त्यांची चर्चा झाली ती फक्त तावरेंच्या उमेदवारांची मत खाल्ल्यामुळे ही चर्चा जोडली गेली ती दोन्ही पवारांच्या नुरा कुस्ती सोबत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शरद पवारांच्या हातून सगळं मैदान गेलं असं म्हणण्याचं कारण म्हणजे बारामतीतली स्थानिक परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आता जवळपास दोन वर्ष होत आली आहेत बारामतीकरांच्या मनात साहेब की दादा नक्की नक्की कोणाची साथ द्यायची याबाबत संभ्रम असल्याची चर्चाही अनेकदा झाली.

कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल दिला पण विधानसभेळी मात्र बारामतीकर अजित पवारांच्या मागे उभे राहिले लोकसभेला पराभव झाल्यानंतर बारामती जिंकण्यासाठी सहकारी संस्था आपल्या ताब्यात असणं गरजेचं असल्याचं अजित दादांच्या लक्षात आलं यातूनच त्यांनी बारामती आणि आजूबाजूच्या सहकारी संस्थांवर लक्ष द्यायला सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या पृथ्वीराज जाचक यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जुळवून घेतलं. त्यांना चेअरमन केलं आणि छत्रपती साखर कारखान्याची सत्ता एकाहाती आपल्याकडे राखली. पण बारामतीकरांच्या मनात नक्की काय याचा अंदाज येण्यासाठी माळेगाव कारखान्याची निवडणूक महत्त्वाची होती.

कारण माळेगाव सहकारी कारखान्यासोबत बारामती मधली 37 गाव जोडलेली आहेत. माळेगाव साखर कारखान्याचे 19 हजारापेक्षा जास्त सभासद आहेत. माळेगावचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या बारामतीतल्या जवळपास सव्वा लाख लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे बारामतीतल्या राजकारणाच्या दृष्टीने या कारखान्याचे महत्त्व मोठं आहे. माळेगाव कारखान्याला बारामतीच्या सहकाराचे केंद्र बारामतीच हार्ट ऑफ पॉलिटिक्स असही म्हटलं जातं म्हणूनच बारामती जिंकण्यासाठी अजित दादांनी आपले विरोधक कमी कसे होतील यावर भर दिला.

आधी त्यांनी जाचकांसोबत जुळवून घेतलं मग तावरेना ऑफर दिल्याची ही चर्चा झाली पण त्यांचा दारुण पराभव करून त्यांना स्थानिक राजकारणात बॅकफूटवर ढकललं अजित पवारांनी आपण स्वतः चेअरमन पदाचा चेहरा आहोत असं म्हणत निवडणूक प्रतिष्ठेची केलीच पण सोबतच बारामतीमध्ये ठाण मांडून सभांचा धडाका लावत ही निवडणूक जिंकली सुद्धा टावरे आणि पवार दोघांचाही पराभव झाल्यानं बारामतीतले लोक अजित पवारांच्या पाठीशी उभे असल्याचा मेसेजच संपूर्ण संपूर्ण राज्यात गेलाय हा मेसेज जाण्याच टाइमिंग पवारांच्या हातून मैदान गेलं हे म्हणण्याचं महत्त्वाचं कारण आहे.`

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजलेल आहे येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील ज्यामध्ये विजय मिळवणं दोन्ही पवारांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे आणि बारामतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा मार्ग संस्थांच्या राजकारणातून जातो आणि बारामतीच्या सहकारात सगळ्यात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक संस्था आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या होल्डमध्ये आली आहे साहजिकच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा या कारखान्याची जादू दाखवणं.

अजित पवारांना जमू शकतं अर्थात अजित पवारांनी जी आव्हान समोर असताना माळेगाव कारखान्याची निवडणूक जिंकली ते बघता अजित पवार या एकाच सहकारी संस्थेवर होळ ठेवून थांबणार नाहीत हे सुद्धा नक्की आहे. पण पवार साहेबांचा कारखाना अशी ओळख असणाऱ्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये शरद पवार तिसऱ्या नंबरवर राहतात. त्यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही. ही गोष्ट महत्त्वाचं मैदान पवारांच्या हातून सुटलं याची ग्वाही देण्यासाठी पुरेशी ठरते.

शरद पवारांनी बारामतीच्या होम पिचवर सलग दुसरी निवडणूक हरली आहे. लोकसभेला त्यांनी अजित पवारांना चीत करत आपणच सत्तेचा केंद्रबिंदू आहोत हे दाखवून दिलं होतं. पण विधानसभेला डाव फिरला. अजित पवारांनी या निवडणुकीत शरद पवार गटाला शर्यतीत सुद्धा येऊ दिलं नाही. त्यात 24 जूनला शरद पवार गटाच्या नेत्यांनी एकत्र येण्याबाबत चर्चा केली होती.

अस विधान करत पवारांनी हात बिवडीची ऑफर दिली होती पण आपण ती नाकारली असे संकेत दिले याच निवडणुकीत दोन्ही पवार एकत्र न आल्याने पवारांच्या युतीच गणित फिसकटल्याची चर्चा जोरदारपणे झाली अजित पवारांनी बारामतीमध्ये शरद पवारांना सोबत न घेता त्यांचाच बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या कारखान्यात विजय खेचून आणला आणि शरद पवारांना निदान कारखान्याच्या राजकारणात तरी इरिलेव ठरवलं आता शरद पवारांचे पॅनल होतं म्हणून मतविभागणी झाली अशी चर्चा होत असली तरी तावरेच्या पॅनलचा निसट्टा पराभव झालेला नाही.

त्यामुळे शरद पवारांशिवाय सुद्धा बारामती मधले शेतकरी आपल्या सोबत असल्याचं अजित पवारांनी दाखवून दिलं आणि विधानसभेनंतर कारखान्याच्या राजकारणातूनही शरद पवार मायनस झाल्यान मैदान त्यांच्या हातून गेलं शरद पवारांनी माळेगावच्या निवडणुकीत पॅनल तर उभं केलं पण मतदानाच्या दिवशी ते स्वतः मतदानासाठी आले नाहीत रविवारी 22 जूनला शरद पवारांचे पुण्यात नियोजित कार्यक्रम असल्यान ते पुण्यात होते, पण तब्येतीच्या कारणामुळ ते बारामतीला मतदानासाठी येऊ शकले नाहीत, अशी माहिती नंतर देण्यात आली.

यामुळं पवारांच्या पॅनलच्या कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाल्याच बघायला मिळालं. साखर कारखान्याच्या निवडणुकीत गावकीमुळे क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता जास्त असते आणि कार्यकर्त्यांना मोरल बुस्ट मिळण्यासाठी प्रमुख नेत्यांची उपस्थिती महत्त्वाची ठरते पण शरद पवार मतदानाच्या दिवशी स्वतः गैरहजर राहिल्यान त्यांनी पराभवाचा अंदाज घेऊन शेवटच्या दिवशी मैदान सोडल्याच्या चर्चा झाल्या पण हे मैदान सोडणं म्हणजे शरद पवार डिस्कनेक्ट होणं मुळात 2020 नंतर अजित पवार एकाहाती माळेगावचा कारभार बघत होते पण तरीही शरद पवारांचा कारखाना खाण्या सोबत सभासदांसोबत कनेक्ट होता.

हाच कनेक्ट या पराभावामुळे गेला एकही संचालक निवडून न आल्यान कारखान्याच्या राजकारणात शरद पवारांचा गट मागे पडला रयत व्हीएसआय विद्या प्रतिष्ठान इथं होल्ड असला तरी बारामतीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी थेट कनेक्ट असणारी संस्था शरद पवारांना गमवावी लागली बारामतीच्या मैदानात स्थान पक्क झालं ते अजित पवारांच दादा विरुद्ध तावरे राड्यात मैदान निसटलं ते पवारांच्या हातून आता या पराभवानंतर शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार कोणते नवीन राजकीय डाव टाकणार हे पाहणं मात्र महत्त्वाच असणार आहे तुम्हाला काय वाटतं बारामतीच्या राजकारणात शरद पवार कमबॅक करतील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…


Spread the love

Leave a Comment