11 डिसेंबर 2023 जालन्याच्या मंठा संमती मेडिकल समोर दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोळीबार होतो ज्यामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात येते गजानन मच्छिंद्रनाथ तौर असं त्याचं नाव असतं गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गजाननचा मोठा चाहता वर्ग होता त्याच्या मृत्यूला तीन वर्ष पूर्ण झाले असले तरीही त्याचा हा चाहता वर्ग काही कमी झालेला नाहीये त्याच्या समर्थकांच्या ओठांवर आजही त्याचं नाव आहे.
शरीर मरता है लेकिन नाम नाही या कॅप्शन सोबत त्याचे फोटो आजही सोशल मीडियावर फिरतात पण गजानन तौरचा वाढदिवस होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही त्याच्या हत्या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत आणि पाहणार आहोत की तौर हत्या प्रकरणाची केस कुठपर्यंत आली आहे त्यात किती आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि सध्या ते आरोपी कुठे आहेत चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात अगोदर तर गजानन तौरचे हत्या कोणत्या कारणावरून झाली यावर थोडक्यात माहिती घेऊयात.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तरुण होता. छत्रपती संभाजीनगर मधील हरसूल तुरुंगात असताना त्याची ओळख ही टायगर उर्फ विलास पवार यांच्याशी झाली. पुढे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आर्थिक देवाण घेवाण झाली आणि त्यातून दोघांमध्ये काहीतरी वाद झाला. दरम्यानचा काळ पाहिला तर तो वाद वाढून पुढे त्यांच्या दुश्मनी तयार झाली ज्यामुळे 11 डिसेंबर 2023 रोजी टायगर उर्फ विलास पवार भागवत विष्णू डोंगरे लक्ष्मण किसन गोरे आणि रोहित नरेंद्र ताटीपा मुलकर यांनी त्याच्यावर गावठी पिस्तूल तसेच चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली.
पुढे या प्रकरणी जालना तालुका पोलीस स्थानका अंतर्गत गजानन तौरचा मित्र माऊली उर्फ ज्ञानेश्वर मांगडे यांने तक्रार नोंदवली होती. गजानन तौर हा जालन्यातील नावाजलेला व्यक्ती आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा कट्टर समर्थक होता शिवाय त्याचे मोठ्या प्रमाणात समर्थक सुद्धा होते त्यामुळे या प्रकरणाला हाय प्रोफाईल बळन लागलं होतं दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन तात्काळ तपासाची सूत्र हलवली आणि अवघ्या 12 तासात भगवान विष्णू डोंगरे लक्ष्मण किसन गोरे आणि रोहित ताटीपा मुलकरला अटक केली होती.
त्यावेळी त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. तसच त्यांच्यावर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल होते तसच हे संघटितपणे काम करत असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा केली होती. आता हे तीन आरोपी जरी अटकेत असले तरी मुख्य आरोपी टायगर हा अद्यापही फरार होता. तसच त्याच्यावर नांदेड, विदर, जालना, घनसावंगी आणि पंजाब मधील अमृतसर मध्ये गुन्हा दाखल होता आणि नांदेड पोलीस त्याला भरपूर दिवसांपासून शोधत होते.
तो वेशांतर करण्यात आणि आपले नाव बदलण्यात पटाईत होता. दरम्यान तोर हत्या प्रकरणी तपास सुरू असताना तो कर्नाटकात पळून गेला होता. तर नंतर त्याने थेटपणे पंजाब मधील अमृतसर गाठलं दुसऱ्या बाजूने पोलीस त्याचा तपास घेत होते तसच त्याच्यावर 50 हज रुपयांच बक्षीसही ठेवण्यात आलं होतं पण तो लवकर सापडत नव्हता. दरम्यान जालना पोलिसांना खबर लागली की टायगर हा कर्नाटकच्या विदरमध्ये लपून बसलाय.
त्यानुसार जालना पोलिसांना कर्नाटक पोलिसांनी संपर्क साधत त्याच्यावर तो बिदरमध्ये असलेल्या ठिकाणी धार टाकली होती. पण पोलीस पोहोचण्यापूर्वीच तो तिथून फरार झाला होता पण बिदरमध्ये तो ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात सापडली. पोलिसांची चौकशी केली असता त्या व्यक्तीने टीप दिली की टायगर हा राजस्थान मार्गे पंजाबच्या अमृतसर मध्ये गेलाय.
त्यानंतर जालना पोलिसांनी अमृतसर पोलिसांशी संपर्क केला आणि संबंधित आरोपी तिथे लपलेला असल्याची माहिती दिली. टायगर तिथे नाव बदलून राहत होता. पुढे जालना पोलिसांच एक पथक ताबडतोप अमृतसर मध्ये पोहोचलं आणि त्यांनी टायगरला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन जालण्यात परतले आणि त्याला न्यायालयासमोर हजर केल असता न्यायालयाने त्याला सुद्धा पोलीस कोठडी सुनावली.
सुरक्षेच्या कारणास्तव तोर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी हे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात होते पण याव्यतिरिक्त आणखी एक उमेश पवार जो की एक दिवस अगोदर गजानन तौरची रेकी करण्यासाठी आला होता. तो पोलिसांच्या ताब्यात आला नव्हता. शेवटी 1 मे 2025 रोजी पोलिसांना खबर लागली की तो आपल्या खरपुरी गावात लपून बसलाय.
त्या आधारावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तर त्याची न्यायालयासमोर पेशी केली असता त्यालाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलय त्याच दरम्यान गजानन तोरचा मित्र तसेच प्रकरणातील फिर्यादी माऊली उर्फ ज्ञानेश्वर मांगडे आणि तोरचे वकील डवोकेट रोहित बनवस्कर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं त्यांनी आपल्याला सुरक्षेची सुद्धा मागणी केली होती.

आता वर्तमानात पाहिलं तर तोर हत्या प्रकरणाचा पोलिसी तपास पूर्ण झाला होता पण त्या दीड वर्षात बरच पाणी पुलाखालून वाहून गेलं. 22 ऑक्टोबर 2024 भागवत विष्णू डोंगरे लक्ष्मण किसन गोरे आणि रोहित ताटीपा मुलकर यांना पोलिसांच्या तांत्रिक चुकीमुळे जामीन मिळाला पण आजही त्यांना जालना जिल्ह्यात येण्यास बंदी आहे तर टायगर उर्फ विलास पवार आणि रेकी करणारा उमेश पवार अजूनही नाशिक कोटेडीत आहे आज टायगरच्या जामीनावर सुनावणी होती पण ही 31 जुलै पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
वकील रोहित बनवस्करांनी गजानन पवारच्या हत्येतील आरोपींना शिक्षा मिळून देण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी दाखवली आहे तर मित्राच्या हत्या हत्यारांना शिक्षा मिळण्यासाठी फिर्यादी माऊली मांगडे सुद्धा न्यायालय लढाईत पूर्ण साथ देतायत तर आता या प्रकरणावर तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद…